Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला व्हिआयपी ट्रिटमेंट
    राजकारण

    विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला व्हिआयपी ट्रिटमेंट

    रोहिणी खडसेंचा आरोप : कुणाच्या आशीर्वादाने होतंय?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 17, 2026No Comments824 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य करणाऱ्या नराधमाला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिलीय. रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, माझ्या जळगाव जिल्ह्यातील धरणगावात शिक्षकाने चौथीतील विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केले. या नराधमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं तोंड काळं करून त्याची धिंड काढायला हवी होती, त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, पण त्याला थेट कोठडीत न टाकता वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. त्याला बसायला खुर्ची, जेवण, डोक्यावर फॅन सर्व व्हिआयपी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.‌ कुणाच्या आशीर्वादाने हे होतंय? माझ्या अन्याय अत्याचारग्रस्त भगिनीला किती नकारात्मक पद्धतीने पाहतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

    धरणगाव हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात येते. गुलाबभाऊ, आपल्या जिल्ह्यात असे घडत असेल तर पालकमंत्री आपण काय संदेश समाजात देत आहोत? तुम्ही यात लक्ष घाला, या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व्हायला हवी, ज्यानी कोण या आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली असेल त्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

    धरणगाव तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी शिक्षकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भातील एक फोटो समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी आरोपी शिक्षकाला कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. त्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif