Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक
    गुन्हे वार्ता

    जळगावात मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक

    पोलिसांवरही हल्ला : तांबापूरा परिसरात तणावपूर्ण शांतता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2026No Comments524 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्युजू नेटवर्क

    शहरातील तांबापुरा भागातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिला आणि एका तरुणामधील वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या हिंसक घटनेत दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

    या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दोन्ही गटांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका महिलेमध्ये आणि तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र, या वादाचे पर्यावसान काही वेळातच दोन गटांमधील मोठ्या संघर्षात झाले. वाद वाढल्याने दोन्ही बाजूंचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दोन घरांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नियंत्रण सुटलेल्या संतप्त जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर आणि कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रात्री साडेएक वाजेच्या सुमारास संपूर्ण परिसरात अतिरिक्त पोलीस बलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

    याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. सध्या तांबापुरा आणि बिस्मिला चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस नागरिकांना शांततेचे आवाहन करत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif