Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी
    गुन्हे वार्ता

    कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

    एकाला भिंतीवर आदळले : जिल्हापेठमध्ये गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments499 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जिल्हा कारागृहातून खळबळजनक घटना घढली असून कारागृहाच्या एका बंदिस्त बराकीतच जुन्या वादाच्या कारणावरून दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादादरम्यान एका कैद्याला जबरदस्तीने भिंतीवर ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, हल्ला करणाऱ्या कैद्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही हिंसक घटना दि. 26 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातील बराक क्रमांक 8 मध्ये घडली. 29 वर्षीय पीडित कैदी (रा. वाल्मीक नगर, जळगाव) हा आपल्या बराकीत असताना, तिथेच बंदिस्त असलेला आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून अचानक त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद काही वेळातच एवढा विकोपाला गेला की, आरोपी श्याम सूर्यवंशी याने पीडित कैद्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान आरोपीने पीडित कैद्याला जोरदार धक्काबुक्की करत थेट बराकीच्या भिंतीवर ढकलून दिले. कडक भिंतीवर डोके आदळल्यामुळे पीडित कैदी रक्ताळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

    या गोंधळानंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यानंतर आरोपीने पीडित कैद्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. कारागृहात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर, पीडित कैद्याच्या तक्रारीवरून जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif