Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दरोड्या प्रकरणी विनोद देशमुख यांना अटक
    ताज्या बातम्या

    दरोड्या प्रकरणी विनोद देशमुख यांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (अप गटा) चे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख यांना तीन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे.
    याबाबत माहिती अशी की, दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी व्यावसायिक मनोज वाणी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी विनोद देशमुख यांच्याविरुद्ध दरोडा व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने मंगळवार दि. 23 सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या पथकाने कारवाई करत विनोद देशमुख यांना अटक केली. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात व्यावसायिक मनोज वाणी यांनी विनोद देशमुख हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक करीत पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. गेल्या तीन वर्षांनंतर अखेर विनोद देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विनोद देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif