जुन्या वादातून महिलेला दारूच्या नशेत शिवीगाळ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): जुन्या वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत एका व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शबाना शरिफ शेख (वय ४०, रा. शिवाजीनगर, हुडको) या महिला १४ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता आपल्या घरी असताना, नितेश मिलींद जाधव उर्फ गोलू (रा. पिंप्राळा, हुडको) याने जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दारूच्या नशेत येत शिवीगाळ केली व दमदाटी केली. यावेळी त्याने शबाना शेख यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
घाबरलेल्या महिलेने तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी नितेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाहेद तडवी करीत आहेत.