तरुणीचा हात पकडून विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;– सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा ती बाजारासाठी टॉवर चौकात दारूच्या नशेत हात पकडून तिच्या मनात लाज उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सुप्रीम कॉलनी परिसरात राहणारी २३ वर्षीय तरुणी हि ८ रोजी फुले मार्केट येथे बाजार करण्यासाठी आली असता संशयित सुनील राठोड आणि राहुल राठोड यांनी दारूच्या नशेत पाठलाग करून तिचा राहुल राठोड याने हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा प्रकार दुपारी चार वाजता घडला .

तर सुनील राठोड याने तुला तोंड दाखवायची लायकीची ठेवणार नाही तुला बदनाम करून सोडेल अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला ११ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क फौजदार विजय पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.