विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत खळबळजनक गौप्यस्फोट

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष (Shiv Sangram Party President) आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघातानंतर आता काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र आता मेटेंच्या मृत्यूबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

विनायक मेटे यांच्या एका सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) असे सहकाऱ्याचे नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे दि. 3 ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.

फोन कॉल रेकॉर्ड नुसार, दि. ०३ ऑगस्टला विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे (Mumbai) जात होतो. त्यावेळी शिक्रापूरपासून (Shikrapur) दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये आयशर ट्रक देखिल होता. शिक्रापूरपासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती, यामध्ये आयशर एक ट्रक सुद्धा होता, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिली.

जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसे त्या गाडीमध्ये होती, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितले. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना देखील सांगितले. या प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here