Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार!
    शैक्षणिक

    वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार!

    ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड : जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments23 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या पुढाकाराने धरणगाव तालुक्यातील वंजारी या गावात ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केले. बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा, करंज सारख्या स्थानिक प्रजातींची झाडांच्या रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरासह सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

     

    शाळेचा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पुढील पिढीमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, जैन फार्म फ्रेश फूडचे कृषीसेवक योगेश महाले यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी मनीषा साळुंखे, ग्रामपंचायत सरपंच वंदना पाटील, सदस्य नामदेव साळवे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश चौधरी, प्रल्हाद साळवे, किरण लोखंडे, विजय महाजन, ग्रामस्थ तसेच कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

    सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, मुख्याध्यापक भिकन पाटील, संदेश शिरसाठ, पी. एस. पाटील, एस. आर. पाटील, राजेश पावरा, किरण पाटील, शुभांगी पाटील, एम. डी. अहिरे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला. लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी शाळा, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ संयुक्तपणे सांभाळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif