Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»गावठी कट्टा, कोयत्यासह दोन तरुण अटकेत
    ताज्या बातम्या

    गावठी कट्टा, कोयत्यासह दोन तरुण अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2026No Comments160 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त

    जळगाव : शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दि. 14 एप्रिल रोजी कासमववाडी परिसरात करण्यात आली.
    एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कासमवाडी परिसरात काही इसम घातक हत्यारांसह फिरत आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस हवालदार प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, किरण चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे यांनी कासमवाडी, नेरी नाका व स्मशानभूमी परिसरात गुप्त पाहणी सुरू केली. दरम्यान, कासमवाडी ते नेरी नाका रोडवरील एकता चौकाजवळील मोकळ्या मैदानात मोटारसायकलवरून येणारे दोन संशयित दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा इशारा दिला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडण्यात यश मिळवले. तपासणीदरम्यान आरोपी रोहित गोपाळ कुंवर (वय 22, रा. कासमवाडी) याच्या कमरेला गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला, तर मागे बसलेल्या सागर रामा सोनवणे (वय 21, रा. आसोदा रोड) याच्याकडून धारदार लोखंडी कोयता व कट्ट्याचे रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आले.
    या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 289/2026 नोंदवून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 70,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गावठी कट्टा, बजाज पल्सर मोटारसायकल, धारदार कोयता व लोखंडी मॅगझीनचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif