गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथे गावठी पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले व त्यास अटक करण्यात आली आहे.

केवडीपुरा भागात राहणाऱ्या प्रविण रविंद्र बागुल वय २० वर्षे या तरुणाकडे सिल्व्हर रंगाचे, प्लास्टिक मूठ असलेले २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाल्यावरुन शनिवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास एरंडोल शहरातील बी.एस.एन.एल. कर्यालयानजीक पिंप्री रोडलगत प्रविण रविंद्र बागुल याच्या ताब्यात गावठी पिस्तूल, चोरीची दुचाकी व मोबाईल आढळल्याने त्यास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली.

याप्रकरणी आर्म ॲक्ट १६३/२०२४  ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. विलास पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.