रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळताच त्यांनी पथक तयार करुने छापे टाकून हात भट्टी उध्वस्त केली. या कारवाईत 32 हजार 50 रु किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. गावटी हातभट्टी धारकांवर पोलीसानी धडक कारवाई केली असून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळा शिवारातील गंगापुरी धरणाच्या काठा वरील वांधावर असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनयम 1949, 65 (फ. ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पो को सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्याद वरुन शत्रुघ्न तुळशीराम पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगीरीपोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप विभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकों नितीन डांबरे, पोकों सचिन घुगे, पोकों/विशाल पाटील, पोकों/ प्रमोद पाटील, यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.