home and gift trade shows super speed wash coupon code august 2013 childrens place coupons 2015 october buy an engagement gift for a boyfriend hrdq coupons personalised birthday gifts johannesburg
Thursday, December 1, 2022

विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; पत्नीचा खुलासा

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा काल रात्री पसरली होती. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली आहे.

- Advertisement -

त्यांची पत्नी वृषाली यांनी सांगितलं की, विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी सांगितलं आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. तसेच या संभ्रमामुळे इतर माध्यमांसह आम्ही देखील ही बातमी प्रसारित केली.

- Advertisement -

गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या