विक्रमादित्य पर्वाचा अस्त

विक्रम गोखले एक दिग्गज सर्जनशील कलाकार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रथितयश सकस सक्षम अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे नुकतेच पुण्यात दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रदांजली.. मी लहानपणापासून त्यांचा एक नियमित चाहता असुन त्यांची नाटके व सिनेमा आवर्जून पहात असे जरी ते परखड स्पष्टवक्ते असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वामधील संवेदनशील कंगोराही तितकाच लक्षवेधक व वैशिष्टय़पूर्ण होता रुबाबदार सदाबहार भेदक नजर व्यक्तिमत्त्व भारदस्त आवाज व जिवंत अभिनय ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

दूरदर्शनवरही त्यांनी ज्ञान माहिती मनोरंजनपर उपक्रम राबवले होते. अपंग, अनाथ, सैनिक व कुष्ठरोगी अशा गरजु लोकांसाठी त्यांनी भरीव समाज कार्य केले आहे. नवोदित कलाकारांना ते अभिनय प्रशिक्षण देत असत व सहकार्य करत असत. अभिनय कसा असावा याचा त्यांनी एक आदर्शच निर्माण केला होता व अभिनयाचा दर्जा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला होता. रसिक चाहत्याच्या प्रत्येक पत्राला ते स्वतः उत्तर देत असत व रसिकांनी अभिनयाकडे कसे पाहावे याची जाणीव त्यांनी रसिकांमधे निर्माण केली होती.

मला त्यांच्या भेटीचा व संवादाचा योग तीन ते चार वेळा आला व त्यांच्यासोबत मनसोक्त छायाचित्र काढता आली. मुंबई येथील रवींद्र नाटयमंदिर येथील सह्याद्री वाहिनीवरील सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्याप्रसंगी मुंबई दूरदर्शनचे निर्माता व माझे स्नेहांकित मित्र डॉ. अश्वीनीकुमार यांनी माझी वैयक्तिक ओळख विक्रम गोखले यांच्याशी करुन दिली होती. हे तर मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असे हे लोकप्रिय अभिनेता विक्रम गोखले जरी आपल्यातुन निघून गेले असले तरी त्यांचे विचार तत्व नितिमुल्य व अविस्मरणीय अभिनयाच्या रुपात कायम आपल्या सर्वांच्या आठवणीत राहतील.

शब्दांकन – रवींद्र कुडाळकर, जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here