लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिण चित्रपटसृष्टीतील फेमस कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा आता खरोखरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत का? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ते खरं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या कपलने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना खात्री पटली आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये एक खाजगी समारंभ होता फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रांच्या उपस्थित साखरपुडा केला. सूत्रांनुसार, हा समारंभ अत्यंत साधेपणाने आणि पारंपारिक विधींनी पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, त्यांचे शाही लग्न २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात होणार आहे.
अलिकडेच, तिच्या आगामी चित्रपट ‘थामा’ च्या प्रमोशन दरम्यान, एका मुलाखतीत रश्मिकाला साखरपुड्याच्या अफवांबद्दल विचारले असता, ती हसत म्हणाली, “सर्वांना माहिती आहे, बरोबर…” या उत्तरामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आणि #RashmikaVijayWedding सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, विजयच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की हे कपल पुढील वर्षी लग्नाची तयारी करत आहेत, पण तारखांबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
रश्मिका आणि विजय २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ चित्रपटाच्या सेटवर भेटले. चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. एका वर्षानंतर, ते ‘डियर कॉम्रेड’ (२०१९) मध्ये पुन्हा एकत्र आले, त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरल्या.

