विजय दर्जी यांना अटक; TET, म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना टिईटी घोटाळ्यातील छाप्यात म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी जळगावातून यांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टिईटी गैरव्यवहाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावात छापेमारी केली. यात टिईटी सोबतच म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात आढळून आले. या अनुषंगाने गोलाणी मार्केटमधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

जळगावात गोलाणी मार्केटमध्ये विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची तपासणी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचार्‍याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानुसार बुधवारी पथक जळगावात धडकले. पथकाने चौकशीअंती ऍड. दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.