Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»डीजेच्या वादातून विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला
    महाराष्ट्र

    डीजेच्या वादातून विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला

    एक तरुण अचानक आला आणि बापटांना थेट मारहाण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2026No Comments202 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यात डीजे बंदीच्या मागणीवरून दोन गट पडले आहेत. गणेश मंडळातील तरुणांकडून डीजे सुरू राहावा, अशी मागणी केली जात आहे. तर विद्यानंद बापट यांच्यासहित इतर पुणेकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे. यावरून पुण्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच डीजेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बापट हे टीव्ही9 शी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणावर पुणे पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे .

    विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील एका तरुणाने हल्ला केला. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, पुणेकरांबद्दल तुला कोणी…असं म्हणत बापट यांच्यावर हल्ला केला. बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया देत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

    पुणे पोलीस म्हणाले, ‘आरोपीने मारहाण का केली, याची माहिती घेणार. व्हिडिओमध्ये एक तरुण मारहाण करताना दिसत आहे. या घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल’. बापट यांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षितरित्या विद्यानंद बापट यांना वाहनातून पोलीस स्टेशनला नेले. परंतु हल्लेखोर तरुण कोण आहे, याची माहिती पोलीस तपासानंतरच समोर येईल.

    विद्यानंद बापट हे एका माध्यमाशी गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी घडलेल्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली.

    घडलेल्या घटनेविषयी बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, एक वेडा अचानक आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. तुम्ही पाहात होतात. त्याने का केला कारण मी सशस्त्र नव्हतो हे पाहून त्यांनी हल्ला केला. किंवा आजूबाजूला पोलीस नव्हते हे पाहून त्याने हल्ला केला. जर पोलीस असते तर ते सशस्त्र. टेकनिकली पोलीस इथे आहेत पण त्यांच्याकडे रिव्हॉलवरच नाहीये. हे बघून ते करतायेत. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्. त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती. सवंग प्रसिद्धीसाठी. तुम्ही पाहिलच आहे. तुम्ही साक्षीदार होतात. तुम्हाला तर माहितीच आहे.

    पुढे विद्यानंद बापट यांना पोलिसात या प्रकरणी पोलिसात तक्रार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी “हो मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर ते आले आहेत.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif