139 उमेदवारांसाठी 36 लाख 46 हजार मतदार बजावणार हक्क !
अकरा विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान : जिल्हा प्रशासन सज्ज
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासाठी 36 लाख 46 हजार 824 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात महिला 17 लाख 70 हजार 762 तर पुरुष मतदारांची संख्या 18 लाख 75 हजार 918 ऐवढी आहे.
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी चोपडा- 9, रावेर-9, भुसावळ-9, जळगाव शहर-29, जळगाव ग्रामीण-11, अमळनेर-12, एरंडोल-13 , चाळीसगाव-8, पाचोरा-12, जामनेर-10, मुक्ताईनगर-7 उमेदवार रिंगणार आहेत. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघात सुरुवातीला 231 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान माघारीच्या अंतिम दिवशी एकूण 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.