धर्मयुद्धाचा शंखनाद!

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावोगाव आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना निवडणुकीला धार्मिक रंग देवून वातावरण ‘भगवे’, ‘हिरवे’ करण्यात आले आहे. सर्वच पक्षांचे बडेनेते धर्मावर आधारीत भाषणे ठोकून मतदारांना आकर्षित करीत आहे. भारतीय जनता पक्षाने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशी गर्जना करुन महाविकास आघाडीसमोर आव्हानच उभे केले आहे. हे असे काय होत आहे याचा विचार प्रारंभी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे. जनतेला महाविकास आघाडीचे जुमले कळून चुकले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व तेथील जेडीपीला बहुमत मिळाल्याने आनंदाच्या उकाळ्या फुटल्या. आपल्या विचारांचे सरकार जम्मू-काश्मीरात अवतरल्यानंतर लगोलग काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेत काश्मीरमधील कलम 370 हटविण्याची मागणी केली आणि पाठोपाठ ती मागणी पूर्ण करु असे आश्वासन काँग्रेस आणि त्यांच्या ताटाखालील मांजरांनी देवूनही टाकली. स्वातंत्र्यापासून तेथील कलम 370 हटविण्याची मागणी असतांना काँग्रेसने ती पूर्ण केली नाही. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने तेथील जनतेला विश्वासात घेवून कलम 370 हटवून सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली.

तेव्हापासून काँग्रेसने काश्मीरातील मुस्लिमांचे तळवे चाटण्यास सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला. काश्मिरातील पराजय हिंदूंच्या जिव्हारी लागणे स्वाभाविकच आहे. एखाद्या राज्यात मुस्लिम एकवटून भाजपाला धडा शिकवू शकते तर महाराष्ट्रात हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ अशी गर्जना केली तर काय बिघडते.

मतदानासाठी काँग्रेस वोट जिहाद करत असाल तर आम्ही पण मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार आहोत, असा इशारा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाच आहे. आम्ही कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही, पण विरोधी पक्ष मात्र हा भेदभाव आमच्या माथ्यावरती मारत असल्याचे फडणवीस सांगायला विसरले नाहीत. वोट जिहादचे प्रकरण हे फक्त विरोधी पक्षांनी आपल्या सोयीसाठी म्हणून सुरू केलेले आहे कारण मुस्लिम धर्मांचे मत घेऊन त्यांना या राज्यात सत्ता उपभोगायची आहे आणि त्या बदल्यामध्ये सर्व विषय 12 पासून आतापर्यंत जे मुस्लिम धर्मांचे आरोपी विविध प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. त्यांची सुटका करायची आहे यासह विविध सत्र मागण्या असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हणूनच हे सर्व सुरू केलेले आहे. तुम्ही वोट जिहाद करा आम्ही धर्मयुद्ध पुकारतो कारण आम्हाला आमच्या धर्माविषयी अभिमान आहे असे फडणवीसांनी ठासून सांगितले आहे. भाजपा महायुती सरकारने आजपर्यंत ज्या योजना राबवल्या त्यामध्ये कुठलाही भेदभाव केलेला नाही कुठल्याही विशिष्ट धर्माला डोळ्यासमोर ठेवून योजनांची अंमलबजावणी केलेली नाही हे अधोरेखित करणारे आहे. असो, राजकीय डाव काहीही असले तरी आपण सुज्ञ नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावणे सोडू नका! ‘लोकशाही’च्या सर्वांगिण विकासासाठी मतदान नक्की करा!!!

Leave A Reply

Your email address will not be published.