Video : रावेर दंगल प्रकरणातबाबतचा ना.गुलाबराव पाटलांनी घेतला आढावा

0

रावेर : येथे रविवारी रात्री दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातबाबतचा आढावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतली. यावेळी आ. शिरीषदादा चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, माजी जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, केळी उत्पादक संघाचे भागवत पाटील, डी के महाजन, रामदास पाटील, युवराज पाटील, सोपान पाटील, सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, किशोर पाटील, राजू सवरणे, बाळू शिरतुरे, आसिफ मोहम्मद, शे गयास आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, पोनि रामदास वाकोडे यांच्याशी दंगली बाबत आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपला शेतीतील केळी काढणी आणि विक्रीची परवानगी मिळावी म्हणून प्रशासनाला विनंती केली. पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेण्याची सर्वांचे कर्तव्य असून आपली आणि देशाची काळजी घेऊन शेती करावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.