Video : लेबननची राजधानी भीषण स्फोटाने हादरली : ७० जण ठार तर ४००० जखमी

0

बैरुत : लेबननची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे.  बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं असून या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.  पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे.

बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये स्थानिक लोकं मदतीसाठी वाट पाहतानाचे चित्र पहायला मिळालं. आधी मृतांचा आकडा ७० तर जखमींचा आकडा २७५० असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून ७० जणांचा मृत्यू झाला असून चार हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.