Video : डीव्हिलियर्सने एका हाताने लगावलेला षटकार थेट स्टेडियमच्या छतावर

0

चिन्नास्वामी स्टेडियमवर एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर १७ धावांनी विजय मिळवला. डिव्हिलियर्सने ४४ चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली.

डिव्हीलियर्स आणि स्टॉयनिस यांनी शेवटच्या २ षटकात तब्बल ४८ धावा कुटल्या. या शेवटच्या २ षटकात या दोन फलंदाजांनी मिळून एकूण २ चौकार आणि तब्बल ६ षटकारांची आतषबाजी केली. या आतषबाजीत डीव्हिलियर्सने तोंडावर आलेला एक चेंडू थेट स्टेडियमबाहेर टोलवला. विशेष म्हणजे हा फटका त्याने एका हाताने फटकावलेला होता. हा व्हिडीओ IPL ने देखील ट्विट केला असून या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर २०३ धावांचे लक्ष्य ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.