पिलखोड, ता.चाळीसगाव (वार्ताहर) : आज दि. 10 रोजी सकाळी 5 वाजता येथील सामाजिक कार्यकर्ते भेंया पांडुरंग पाटील व त्याचा ड्रायव्हर मुश्रीफ आपल्या मारुती व्हॅनने दुथ घेण्यासाठी जात असताना पुष्पराज हॉटेलच्या पुढे एका शेतात कार पंचर काढताना आढळले. त्यांनी चौकशी केली असता हमारे 2 जण आ रहे असे सांगितले. पाटील यांना शंका आल्याने गाडीत पहिल्या असता 2 गायी कोंबल्या होत्या. पाटील यांनी आपले मित्र अमोल,टिकू, शांताराम, संजय पाटील व पोलीस पाटील यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. ते आल्यावर दोघाना पकडले व त्याचे 2 साथीदार मोटारसायकलने मालेगावकडे प्रसार झाले.
त्या क्षणी साकुर फाटा चेक पोस्ट वर ड्युटी वर असलेले पोलिसांना दूरध्वनीवरून कळवले त्या दोघाना पोलिसांने ताब्यांत घेतले.सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास उसाच्या शेतांतुन येत असताना 2 जण यांना ग्रामस्थांनी दोघाना पकडले व त्यांना चांगला चोप दिला.मेहुनबारे पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व ग्रामस्थांनी 6 चोरट्यांना ताब्यात दिले चोरट्यांची टाटा इंडिको गाडी (क्र.MH 20 BC 7753) व 2 गायी सापडल्या आहेत तसेच 3 दिवसापूर्वी पिलखोड येथील 3 गाईची चोरी झाली आहे. सदर चोर मालेगाव व धुळे येथील असल्याचे समजते.