Video: अरे बापरे! चालकाचा इंजिनवरील ताबा सुटला अन् संपूर्ण ट्रेन उलट दिशेने धावली

0

नवी दिल्ली – उत्तराखंड मध्ये बुधवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना  टळली आहे. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले आहे.

ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे.


या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली नॉर्दन रेल्वेने लोकोपायलट आणि गार्डला निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास चारवाजेच्या सुमारास होम सिग्नलजवळ एक प्राणी ट्रेनखाली येत असल्याचे दिसताच चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्यानंतर ट्रेन थांबली आणि ट्रेनचे इंजिन आणि ब्रेकने काम करणे थांबवले आणि ट्रेन विरुद्ध दिशेने धावली.

बनबसामध्ये दगड लावून ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रेन थांबली नाही. इज्जतनगर मंडळचे पीआरओ राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या तपासासाठी तीन ए-ग्रेड ऑफिसर्सची टीम स्थापन करण्यात आली आहे. तपासात घटनेतील दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. गेल्या महिन्यात 26 फेब्रुवारीपासून पूर्णागिरी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु झाली होती. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हर्च्युअल माध्यमातून टनकपूर स्टेशनवरुन या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.