उपराष्ट्रपती निवडणुकीला सुरुवात, जगदीप धनखर आघाडीवर

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक सुरु असून त्यात NDA कडून जगदीप धनखर तर UPA कडून मार्गारेट अल्वा या उमेदवार आहेत.

एम व्यंकैय्या नायडू यांचा कार्यकाल १२ ऑगस्ट रोजी समाप्त होत असून पुढील उपराष्ट्रपती त्यांच्या जागी विराजमान होतील. ज्यामध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर हे एकट्या भाजपच्या पाठिंब्याने विजयी होण्याची अपेक्षा आहे. तर विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा या दुसऱ्या स्थानावर आहेत.

उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता

कलम 66 3 व 4 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या पात्रता देण्यात आलेले आहेत.

तो भारताचा नागरिक असावा.

त्यांनी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत.

तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.

त्याने भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतीही लाभाचे पद धारण केलेले नसावे.

उपराष्ट्रपतींचे कार्य व अधिकार

सामान्य परिस्थितीत उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही कार्य नसते. अशावेळी ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात. “राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात”.

1) उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणून राज्यसभेमध्ये लोकसभा अध्यक्षा प्रमाणे कार्य व अधिकार उपराष्ट्रपतींना प्राप्त आहेत.

2)राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पदग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात.

3) उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती असतात तेव्हा ते राज्यसभेचे सभापती असत नाहीत.

4) उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती असतात तेव्हा त्यांना राष्ट्रपती पदाचे सर्व अधिकार व उन्मुक्ती  प्राप्त असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here