शिक्षणासाठी केलेला खर्च समाजाने सर्वोत्तम गुंतवणुक समजावी
कवायीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिक्षण ही पाल्यांची मुलभूत गरज आहे, प्रत्येक पालकांनी ती देणे आवश्यक आहे. इतर बाबींवर खर्च होतो मात्र शिक्षणासाठी केलेला खर्च ही भविष्यातील सर्वोत्तम गुतंवणूक समजणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलगुरु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी केले. डॉ. एस.टी.इंगळे, प्र-कुलगुरु, डॉ. विनोद पाटील, कुलसचिव व पतपेढीचे संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षण सर्वोत्तम गुंतवणुक :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढीतर्फे अधिसभागृहात विद्यापीठातील सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या संबोधनात ते पुढील म्हणाले की शिक्षण ही अन्न, वस्त्र आणि निवारा प्रमाणे मुलभूत गरज आहे. त्याशिवाय आपण सामाजिक जीवन जगू शकत नाही. शिक्षण महाग झाले आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र त्यावरील खर्च ही केवळ विद्याथ्र्यांचेच नव्हे तर समाजाचे भविष्य उज्ज्वल करणारी सर्वोत्तम गुतंवणूक आहे.
केवळ पदवी नव्हे तर कौशल्य ही प्राप्त करा :
गुणवंत पाल्यांना संबोधित करतांना कुलगुरु म्हणाले की, विद्याथ्र्यांनो केवळ पदवी प्राप्त करुन थांबू नका तर त्यासोबत कौशल्यही प्राप्त करा. कालानुरुप योग्य कौशल्य निर्धारित करा, ते आत्मसात करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करा. कारण आधुनिक जगात शिक्षणाबरोबर विविध कौशल्य प्राप्त युवकांची देशाला गरज आहे.
वुका वर्ल्ड संकल्पना :
आजच्या जगास VUCA World म्हणून संबोधले जाते. यातील V म्हणजे अस्थिरता (Volatility) U म्हणजे अनिश्चितता (Uncertainty) C म्हणजे गुंतागुंत (Complexity) आणि A म्हणजे अस्पष्टता (Ambiguity) होय. स्पर्धात्मक जगातील व्यवसाय आणि नोकरीतील अस्थिरता व अनिश्चितता, संबंधामधील गुंतागुंत आणि भविष्यातील अस्पष्टता असलेल्या या जगात टिकायचे असेल तर कौशल्याभिमूख शिक्षण गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले.
चिमुकल्यांनी स्विकारले पारीतोषिक :
तत्पूर्वी कुलगुरु महोदयांच्या हस्ते इयत्ता पहिली पासून पदव्यूत्तर पदवी पर्यंत गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र, भेटवस्तूही देण्यात आली. उमवि कर्मचारी सहकारी पतपेढी सातत्याने अभिनव उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. सलग पंचवीस वर्ष सदस्य असणा·या सभासदांचा यथोचित सन्मान याप्रसंगी करण्यात आला. तद्नंतर पतपेढीची तीसावी सभा संपन्न झाली.
याप्रसंगी विद्यापीठाचे डॉ. एस.टी. इंगळे, प्र-कुलगुरु, डॉ. विनोद पाटील, कुलसचिव यांचेही समायोचित संबोधन झाले. प्रास्ताविक डॉ. महेंद्र महाजन, पतपेढी अध्यक्ष यांनी केले. व्यासपीठावर डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्ष, अरुण सपकाळे, सचिव, अशोक पाटील, राजू सोनवणे, डॉ. दिनेश लाड, संजय ठाकरे, डॉ. अनिल लोहार, दिपक गावीत, जयश्री देशमुख, वैशाली शर्मा आदि संचालक मंडळ उपस्थित होते. जगन्नाथ पाटील, आनंदराव पाटील आणि पतपेढीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य या प्रसंगी लाभले.