गुणवत्ता, सचोटीसाठी खेळ महत्वाचा !

कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांचे प्रतिपादन : क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते. सामाजिक माध्यमांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यात नेतृत्व क्षमता, सांघिक भावना, अपयश पचवण्याची क्षमता यासह गुणवत्ता, सचोटी निर्माण व्हावी यासाठी खेळ महत्वाची भूमिका ठरत असतात, के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव याची साक्ष आहे. के.सी.ई.सोसायटी सलंग्न संस्था अशा स्तुत्य क्रीडा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही असे प्रतिपादन कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित ‘के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सवा’चे उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थांसोबत संवाद साधताना मनोगत व्यक्त केले.

यावेळी के. सी. ई. सोसायटी उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, ॲड. प्रमोद पाटील, सचिव, डी. टी. पाटील, ॲड. प्रविणचंद्र जंगले, डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अशोक राणे, शशिकांत वडोदकर, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या आगमनानंतर ध्वजारोहण करण्यात आले.

के.सी.ई.सोसायटीच्या विविध विद्याशाखेमधील एन.सी.सी.,एन.एस.एस.,स्काउट गाईड विद्यार्थी पथसंचालन आणि निरिक्षण करण्यात आले. खेळाडूना शपथ विद्यार्थिनी सिद्धी पाटीलने दिली. स्वरदा संगीत विद्यालया सादर केलेल्या स्वागत गीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली.

प्रातिनिधिक स्वरुपात स्क्वश स्पर्धेतील शालेय स्तरावरील राष्ट्रीय पदक विजेता विद्यार्थी यश मराठे आणि बुद्धिबळ स्पर्धेतील शालेय स्तरावरील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता हर्षवर्धन वले यांचा कुलगुरू व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेंद्र नारखेडे, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.आकाश बिवाल, निलेश खडके, चंद्रलेखा जगताप, योगेश चव्हाण, लोकेश चौधरी, साधू तागड आदींचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.