Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नीचे निधन
    मनोरंजन

    ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नीचे निधन

    संगीतविश्वात हळहळ : सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 13, 2026No Comments217 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या अजरामर संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांच्या पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे 12 जुलै रोजी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे देण्यात आली असून, संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

    गायिका प्रियांका मित्रा यांनी सोशल मीडियावर शर्मा कुटुंबीयांचा संदेश शेअर करत सुनीला शर्मा यांच्या निधनाची माहिती दिली. या संदेशात, “आमच्या लाडक्या ‘अम्मा’ सुनीला प्यारेलाल शर्मा यांनी 12 जुलै रोजी कुटुंबीयांच्या सहवासात शांतपणे या जगाचा निरोप घेतला,” असे लिहिले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असल्याचेही या संदेशात म्हटले आहे.

    सुनीला शर्मा या गायिका नसल्या तरी, पती प्यारेलाल यांच्या संपूर्ण संगीत प्रवासात त्या त्यांच्या खंबीर साथीदार होत्या. गेल्या काही वर्षांत त्या अनेक संगीत रिअॅलिटी शोमध्ये प्यारेलाल यांच्यासोबत दिसल्या होत्या. ‘इंडियन आयडॉल 13’, ‘सा रे ग म प’ आणि ‘सुपरस्टार सिंगर’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे, आरती करणे आणि आपुलकीने संवाद साधणे यामुळे त्या प्रेक्षकांच्याही परिचयाच्या झाल्या होत्या.

    सुनीला शर्मा यांच्यावर 13 जुलै रोजी मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif