Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»जेष्ठ्य अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या
    महाराष्ट्र

    जेष्ठ्य अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या

    व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत.. काय आहे कारण?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 17, 2026No Comments551 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठी सिनेमाच्या 1980 ते 90 च्या दशकात रुपेरी पडद्यावर गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाविरुद्ध तीव्र असमाधान व्यक्त करत रोष दाखवला आहे. राज्य शासनाकडून नुकताच त्यांना प्रदान करण्यात आलेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर परत केला.

    उषा चव्हाण यांचे म्हणणे आहे की, पुण्यातील टीडीआर प्रकरणात शासनाकडून त्यांना न्याय मिळालेला नाही, तसेच संबंधित आयुक्त राम यांच्याकडूनही न्याय मिळालेला नाही. तरीही, पुण्यातील टीडीआर प्रकरणातील न्यायालयीन निकाल त्यांच्या बाजूने लागला असूनही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना न्याय मिळालेला नाही, म्हणून त्यांनी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    उषा चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली असल्याने, त्यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी अभिनेते मंगेश देसाई यांनीही आपले मत व्यक्त करत सांगितले की, एकनाथ शिंदे हे कलाकारांवर प्रेम करणारे असून ते नक्कीच उषाताईंना न्याय मिळवून देतील. मंगेश देसाई यांनी ही प्रकरण ऐकून संबंधित आयुक्तांशी बोलणी सुरू असल्याची माहिती दिली असून, लवकरच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.

    उषा चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित नाव असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शासनाने नुकताच त्यांचा गौरव करत व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता, मात्र न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी तो परत करण्याचा निश्चय केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif