गणित संबोध परीक्षेत वेदांतीचा प्रथम क्रमांक

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘चंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ, चंद्रपूर’ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय “गणित संबोध परीक्षा” वर्ग 5 व वर्ग 8 गटासाठी घेण्यात आली. या परीक्षेत गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर येथील कुमारी वेदांती अमित नवघरे हिने उज्वल यश संपादन केले असुन, वर्ग 8 गटात प्रथम क्रमांक मिळवत तिने शाळेचा गौरव वाढवला आहे.

या प्रसंगी कुमारी वेदांतीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून पुरस्कृत करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक वर्ग आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले. वेदांतीच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.