‘वेड’ ने सैराट , लयभारीचा विक्रम मोडला ; जंगी सेलिब्रेशन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वेड या चित्रपटाने सैराट आणि लय भारी या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत केवळ दोन आठवड्यात ४०.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. यामुळेच सर्व टीमने मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळते. रितेशने देखील याबाबतचे एक पोस्टर पब्लिश करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे वेड अजूनही थिएटर्समध्ये गर्दी खेचत आहे.

या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शनात देखील पदार्पण केले. चित्रपटाच्या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ज्यामध्ये संपूर्ण टीम आनंद व्यक्त करताना दिसत आहे. चित्रपट लवकरच ५० कोटींचा देखील आकडा पार करेल असा विश्वास वेडच्या निर्मात्यांना आहे. रितेश-जेनेलिया ही खऱ्या आयुष्यातील जोडी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.