पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अक्षय भालेराव या वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असणाऱ्या युवकाची नांदेड जिल्ह्यातील बोल्डार गावी १ जुन रोजी जातीयवादातून निर्घुन हत्या करण्यात आली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावामध्ये साजरी केल्याच्या रागातून काही जातीवादी लोकांनी अक्षयची निर्घुणपणे हत्या केली होती. अक्षय भालेराव या युवकाच्या मारेकऱ्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी व कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा तीव्र स्वरूपात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निषेध करण्यात आला.
तसेच दुसरी घटना ही हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी खुर्द येथील आहे. येथील मातंग समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. याचा जातीयवादी लोकांना राग येऊन त्यांनी मातंग समाजाच्या वस्तीवर रात्रीच्या वेळेस दगडफेक केली आणि मातंग समाजाच्या तरुणांवरच दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच तिसरी घटना ही लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यातील आहे येथील मातंग समाजातील एका युवकाने सावकाराकडून टक्केवारीवर पैसे घेतले होते ते वेळेवर परत न केल्याने सावकाराने मातंग समाजातील युवकाच्या डोळ्यात मिरची टाकून मारहाण करून खून केला आणि चौथी घटना ही मुंबई येथील चर्चगेट मधील सावित्रीबाई फुले वस्तीगृहात मातंग समाजातील मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला.
या जातीवादातून घडणाऱ्या घटना, खून, बलात्कार हे वाढत चालले आहे आणि महाराष्ट्र शासन हे याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकरिता वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल बागुल, चाळीसगाव तालुका अध्यक्ष पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, एजाज पिंजारी शेख मुस्ताक, चाळीसगाव शहराध्यक्ष सागर निकम, पारोळा तालुका अध्यक्ष गौतम निकम, अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, जळगाव जिल्हा पश्चिमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

