जळगावात होणार विक्रमी विनोदी नाटक “वासूची सासू”

महिलांसाठी ५०% सूट, मर्यादित तिकिटे उपलब्ध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावकरांसाठी खुशखबर आहे.  ‘वासूची सासू’ या विक्रमी विनोदी नाटकाची पर्वणी जळगावकरांना लाभणार आहे. हे दोन अंकी नाटक असून या नाटकाचा ७४ वा प्रयोग जळगावात होणार आहे. या नाटकात नावाजलेले कलाकार आपल्या भेटीला येणार असून तुम्हाला पोट धरून खळखळून हसवणार आहेत. या नाटकात बंडू – अंकुर वाढवे, वासू – अमोघ चंदन, शीतल – संजना पाटील, किशोर – मयुरेश पंडित, सोराबजी – सुयश पुरोहित, ज्योत्स्ना – तपस्या नेवे, सखाराम – दीपक जोईल, अण्णा – (विक्रमार्जुन) आकाश भडसावळे, सोबत बाई – (पद्मश्री) नयना आपटे या कलाकारांचा सहभाग असणार आहे.

दि. ९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी रात्री ८ वाजता संभाजीराजे नाट्यगृहात हा प्रयोग होणार आहे. यासाठी एसडी इव्हेन्टस् मोहिते काॕर्नर स्वातंत्र चौक याठिकाणी तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे. जन्माष्टमीनिमित्त महिलांनी महिलांसाठी आणलेल्या नाटकाला यावे म्हणून 50% सूट देण्यात आली आहे. हे नाटक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे व  महिला भगिनींना याचा फायदा घेता यावा म्हणून पद्मश्री नयना आपटे यांचेकडून प्रसारित होणार आहे. म्हणून या नाटकाची मर्यादित तिकीट शिल्लक असल्याने लवकरात लवकर तिकीट बुक करावे असे आवाहन राधा एंटरटेनमेंट यांनी केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.