Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी वरोऱ्यात आंदोलन
    ताज्या बातम्या

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी वरोऱ्यात आंदोलन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी वरोऱ्यात आंदोलन

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यातील वरोऱ्यात असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत नागपुर-चंद्रपूर महामार्गावर आज “चक्काजाम आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात बळीराजा मोठ्या संकटात असला, तरीही महायुती सरकारने मोठमोठ्या वल्गना देऊन फक्त रिकाम्या आश्वासनांमध्ये लोकांचा वेळ वाया घालवला आहे, असा संताप व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी भाजपाने “सातबारा कोरा… कोरा… कोरा…” अशी घोषणा केली होती; पण ती अंतर्भूत आश्वासने पूर्ण न झाल्याने सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा या आंदोलनात आरोप केला गेला.

    शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून राज्य सरकारला तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली.तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपये तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.
    या आंदोलनास चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रितेश तिवारी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा, वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, तसेच वरोरा व भद्रावती शहराध्यक्ष विलास टिपले व सूरज गावंडे, तसेच अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    शेतकऱ्यांचे कुटुंब अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष आवश्यक असल्याचा संदेश या चक्काजाम आंदोलनातून देण्यात आला. सरकारकडून होणाऱ्या धोरणात्मक दुर्लक्षाला विरोध नोंदवून, तातडीने शासकीय योजनेची मागणी करीत या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपाय योजण्याची मागणी जोरदारपणे यावेळी केली गेली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Chakkajam Chandrapur highway in Varora farmer Nagpur-Chandrapur highway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif