वरणगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

0

वरणगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

वरणगाव, ता. भुसावळ शहरातील श्री रामपेठ परिसरातील आठवडे बाजार भागातील रहिवाशी तसेच नगर परिषदेचे पाणीपुरवठा कर्मचारी सुनील भिका भुसांडे ४८ यांचा दि .६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे जात असतांना अपघात झाला होता . अखेर त्यांची दि१० रोजी रात्री प्राणज्योत मालवली .
या बाबत ची माहिती अशी की सुनील भुसांडे हे पहुर येथिल त्यांच्या मुलीची भेट घेऊन अजिंठा मार्गे बुलढाणा येथिल त्यांच्या मित्राच्या वडिलांना पहाण्यासाठी जात होते . त्यावेळी घाट चढल्यावर बुलढाणा रस्त्यावर दुर्दैवाने त्यांच्या दुचाकीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला . त्यांना बुलढाणा येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते . अखेर चार दिवस बुलढाणा येथे मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली . त्यामुळे त्यांच्या एकूलत्या मुलाचे पितृछ्त्र हरपले आहे . तो पुणे येथे बीईच्या प्रथम वर्षाला आहे . सुनिल भुसांडे यांचे वर वरणगाव येथे शनिवार दि११ रोजी शोकाकूल स्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार असुन ते शिव भुसांडे यांचे वडील होते .

Leave A Reply

Your email address will not be published.