शेंदुर्णी ता. जामनेर

धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटी. लि. शेंदुर्णी या संस्थेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ९-३० वाजता आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे तर प्रमुख अतिथी म्हणुन जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या ॲड. सुरेखा महाजन, सोलापुर जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष बाबाराजे उर्फ शहाजीराजे देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड राहणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी विवेक धांडे, तहसीलदार नानासाहेब आगळे, सपोनि. प्रविण दातरे, पोउनि. नंदकुमार शिंब्रे, उपनगराध्यक्ष शरद बारी, तसेच विष्णु काळे, सौ. विजया खलसे, संजय पाटील, शांताराम गुजर, डॉ. किरण सुर्यवंशी, भागवत पाटील, सुधाकर बारी, दगडु पाटील, उत्तम थोरात, प्रकाश झंवर, राजेंद्र पवार, पंडित जोहरे, गोपाळ गरुड व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, संचालक रघुनाथ पाटील, किशोर पाटील, राजेंद्र शेळके सौ. उज्वला काशिद, कार्यालयीन सचिव दिपक गरुड, वसतीगृह सचिव गोविंद सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके, प्राचार्य एम. एन. कोळी, मुख्याध्यापक बी. टी. माळी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.


