कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

वरणगाव येथील आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मुळ रहिवाशी असलेले व ह. मु. आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये  राहत  आसलेले रमेश लखन बारेला हे आपल्या पत्नी संगीता रमेश बारेला हे मोलमजुरीसाठी आले होते. दि २९ मे रविवार रोजी या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संगीता बारेला (वय २७) या विवाहितेने दुपारी दिड वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केल्याने तीला वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रमेश लखन बारेला यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.