वरणगावला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील सिनेमा रोड परिसरातील तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १० मंगळवार रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आयुध निर्माणीकडील परिसरातील रहिवाशी सुरेश भिका सन्नासे (वय ३५) याने दि १० मंगळवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या लोखंडी पाईपाला लांब रुमालाचा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला श्रीराम भिका संन्नासे यांच्या खबरीनुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजीव मोढे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.