Sunday, May 29, 2022

घरात घुसून महिलेचा विनयभंग; तरुणास अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

वरणगाव शहरातील साधना नगर मधील रहिवाशी असलेल्या महिला घरात एकटी असल्याचे पाहून तीच्या घरात प्रवेश करीत विनयभंग केल्याची घटना दि ९ शनिवार रोजी उघडकीस आली असुन तरुणास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवार दि ९ रोजी बस स्थानक परिसराजवळील साधना नगर मधील रहिवाशी असलेल्या पिडीत महिला रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवन झाल्यानंतर आपल्या घराचा दरवाजा बंद करून झोपलली असताना शेजारीच राहणाऱ्या संदिप लखीचंद बनवे हा दारुच्या नशेत घरात अनाधीकृत प्रवेश करीत महिलेला शारीरिक सुखाची मागणी करीत तिला लज्जा वाटेल असे कृत करीत तिच्या गळ्यावर नखाने जखमी केल्याने महिलेने आरडाओरड केल्याने शेजारच्यांनी त्या घराकडे धाव घेऊन महिलेची सुटका केली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी नुसार वरणगाव पोलीस स्टेशनला संशयीत आरोपी संदिप बनवे याच्याविरोध भादवी कलम ३५४, ५०६, ५१०, ४५२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मुकेश जाधव हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या