Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    संपादकीय

    वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2026No Comments53 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांना नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून दहा महिने झाले आहेत. या दहा महिन्यांच्या कालावधीत वरणगाव शहराच्या विकासासाठी जो निधी मिळाला पाहिजे, तो मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ६० हजार लोकसंख्या असलेल्या वरणगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने शहराचा विकास शून्य होत आहे. शहरातील रस्ते, शहरातील पाणीपुरवठा, शहराची स्वच्छता आणि आरोग्य, शहरातील विजेचे व्यवस्थापन यासाठी दैनंदिन जो पैसा लागणार आहे, तो मिळत नाही. वरणगाव शहरातून महामार्ग गेला आहे. त्या महामार्गावरील डिव्हायडरचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत आहेत. हे टाळायचे असेल, तर त्यासाठी निधी लागणार आहे, जो निधी मिळत नाही. त्याचबरोबर महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली दैनंदिन बाजार भरवावा, ही मागणी जुनीच आहे. त्याला रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे; परंतु तेथे बाजार भरवला जात नाही, ही शोकांतिका आहे. या सर्व बाबींसाठी निधी लागणार आहे, जो निधी शासनाकडून मिळावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे हे सायकलवरून वरणगावहून जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन दिले. वरणगावच्या विकासाकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा सायकलवरचा प्रवास केला, असे ते म्हणतात. जिल्हाधिकारी आमचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतील. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि आम्हाला वरणगावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मदत करतील, अशी आशा सुनील काळे यांनी व्यक्त केली आहे. पाहूया काय होते ते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif