वरणगाव येथे शिवजयंती निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या वतीने मॅरोथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी या संकल्पनेतून वरणगाव सिव्हील सोसायटीने रन फॉर वरणगाव भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि १९ रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेला वरणगावच्या उड्डानपुल जवळून सुरुवात होणार असून, हि स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धा 5 कि.मी व 10 कि मी अंतराची असणार आहे, स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दि १४ फेब्रुवारी हि अंतिम तारीख आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त तरुण, तरुणींनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना रोख बक्षीस तसेच दहा लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा. अनिल शिंदे (७९७२००४३६३), शरद पाटील (८९९९४७६५०१) यांच्याशी संपर्क साधावा

Leave A Reply

Your email address will not be published.