महिलेला तीन लाखात गंडवले; गुन्हा दाखल

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव येथील ३४ वर्षीय महिलेला रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे सांगून २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री धनराज महाजन (वय ३४ रा. मकरंद नगर, वरणगाव ता. भुसावळ) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

जयश्री धनराज महाजन हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांना सुधीर शर्मा रा. १२ चौक स्टेशन रोड गिरिदिह झारखंड असे नाव असलेल्या व्यक्तीने १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान इंडिया मार्ट वरून बोलत असल्याचे सांगून स्वतः रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवले. त्यानुसार जयश्री महाजन यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांनी ३७ रेफ्रिजरेटर, ७ एसी आणि एक वाशिंग मशीन अशी ऑर्डर दिली.

सदर ऑर्डर दिल्यानंतर जयश्री महाजन यांनी २ लाख ९७ हजार ५०७ रुपये ऑनलाइन पैसे पाठवले. मात्र पैसे पाठवून सुद्धा दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कोणताही माल घरापर्यंत आला नाही. त्यांनतर जयश्री महाजन यांनी सुधीर शर्मा नामक व्यक्तीला वारंवार फोन केले. परंतु त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री महाजन यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात सुधिर शर्मा नामक व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि आशिष अडसूळ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.