Friday, May 20, 2022

वरणगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

वरणगाव शहरातील सातवीत शिकणाऱ्या मूलीला मोटर सायकलीवर नेवून बोदवड रस्त्यावरील नागरेश्वर मंदिरा जवळील एका सुनाट जागेतील खळ्यात एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सोमवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील सातव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी तीच्या आईला मदरशात जाते असे सांगून घराबाहेर पडली. मदरशाच्या काही अंतरावर तीच्या ओळखीचा मजिदशाह हमीदशाह हा तिच्या मागे मोटर सायकल घेऊन थांबला. मला तुझ्याशी काम आहे असे सांगत तिला दुचाकीवर बसवून बोदवड रोडने घेऊन गेला. मला कुठे नेत आहे ? असा मूलीने जाब विचारला असता गुपचुप बस नाहीतर तुला मारून टाकेल असा दम दिला.

थोड्याच अंतरावरील नागेश्वर मंदिराजवळ गाडीतले पेट्रोल संपल्याने मुलीला रोडवर एकटी उभी करून मजिदशाह पेट्रोल घेण्यास निघुन गेला. थोड्या वेळाने पिंपळगाव कडून दोन मुले आले व मजिदने तुला बोलावले आहे. आमच्या सोबत चल असे सांगितले. मूलीने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिल्यानंतर थोड्या वेळाने मजिदशाह हा गाडी घेऊन त्या ठिकाणी आला व त्यांच्या मित्राला रोडावर उभे करून लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलीस रोडाच्या बाजूला असलेल्या खळ्यात घेऊन गेला व मूलीवर अत्याचार केला.

पीडित मुलगी तिच्या घरी आल्यानंतर सर्व हकीकत सांगितल्यावर सदर घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादी नुसार भादवी कलम ३७६, A B, ५०६, ३४ प्रमाणे संशीयत आरोपी मजिदशाह हमीदशाह व त्याच्या दोन मित्रांच्या विरोधत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उप निरिक्षक आशिष आडसुड हे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या