आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीमधील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे पार पडलेल्या विविध क्रिडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले. त्यातील विद्यालयाचे सात विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

केंद्रीय विद्यालयातील एकूण ७९ विद्यार्थ्यांनी खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ, योगा, अथेलेटिक्स  इ. खेळांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी २९ विद्यार्थ्यांची क्षेत्रिय स्तरावर निवड झाली होती. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. त्यात १७ वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धेत वैष्णवी बरकडे हिची निवड झाली असुन खो-खो स्पर्धेत रुपल चव्हाण, राज गुरचळ, दिशांत सांगलकर, कुणाल महाजन, ओम महाजन यांची निवड झाली आहे.

तर १४ वर्षांआतील बॅडमिंटन स्पर्धेत हेमराज लवंगे याची निवड झाली आहे. सदरच्या स्पर्धा पुणे येथे पार पडल्या होत्या. प्राचार्य राजेशकुमार पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रिडा प्रभारी सुनिल टाकळकर तथा प्रशिक्षक रोहित खर्चे, प्रशांत शेकोकार, चेतन प्रकाश, गणेश माळी, रुपाली निकुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.