पक्षी मित्रांनी वाचविले शेकडो पक्षाचे जीव

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आयुध निर्माणी परिसरात शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.  त्यात निर्माणीतील वसाहत देखभाल दुरुस्ती कार्यालयाच्या परिसरातील झाडे उमळून पडल्याने त्यावरील काही पक्षी मयत झाले तर शेकडो पक्षांना वाचविण्यात पक्षी मित्रांना यश आले.

काल दि. १० शुक्रवार रोजी संध्याकळच्या सुमारास  जोरदार वादळ आणि गारासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे परिसरातील काही ठिकाणी नुकसान झाले तर आयुध निर्माणीतील वसाहत देखभाल दुरुस्ती कार्यालय परिसरातील काही झाडे उमळून जमीनदोस्त झाल्याने विद्युत तारा तूटून विज पुरवठा खंडीत झाला होता.

उमळून पडलेल्या झाडावर वास्तव्यास असलेले अनेक प्रकारचे वन्यपक्षी गाराच्या तडाख्याने जमीनवर आपटल्याने मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाली.  पक्षी मित्र कैलास ठाकुर, निशांत रामटेके, स्वप्नील सुरवाडे, अक्षय तेली व चातक सस्थेचे सदस्य यांनी अंधारातच या घटना स्थळी धाव घेतली. शेकडो पोपट तडफडत असताना एक एक पक्षी उचलून एका खोलीत ठेऊन पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. एस एन कोल्हे यांना पाचरण करून जखमी झालेल्या पक्षावर औषध उपचार केले.  व रात्रभर त्यांच्यावर निगराणी ठेऊन होते.  सकाळी वन विभागाच्या वनपाल दिपाली जाधव यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्या नतंर सकाळी शेकडो पक्षांना मुक्त संचार करिता त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.  त्यानतंर मात्र पक्षी मित्रांच्या चेहर्‍यावर आनंद मावेनसा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.