वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मंगळवारच्या दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्याने आठवडे बाजारात दुकानदाराची तारंबळ उडून नुकसान झाले. तर जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील डोरेदार निंबाचे झाड पडल्याने दुचाकी दबल्याने एक जखमी झाला तर फुलगाव येथे पाण्याची टाकी अंगावर पडल्याने तरुणाला गंभीर इजा झाल्याची घटना घडली.
अचानक आलेल्या मंगळवार रोजी जोरदार वादळी वाऱ्याने परिसरात अनेक झाडे उमळून पडले तर वरणगाव येथे लग्नानिमीत्त आलेले सुनसगाव येथील लीलाधर जर्नाधन पाटील (वय ५७) व प्रमोद गलू पाटील (वय ४८) हे दोघे भुसावळ कडे आपल्या दुचाकी क्र एम एच १९ डी वाय ५९ ३७ या दुचाकीने जात असताना जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील जलदर नगर जवळ निबांचे झाड त्यांच्या अंगावर पडल्याने दुचाकी दाबली गेली. यात दोघे गंभीर जखमी झाले.
दरम्यान त्यांना नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. तर फुलगाव येथे घराच्या छतावर ठेवलेली प्लास्टिकची पाण्याची टाकी शुभम कोलते यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या चोहऱ्याला गंभीर दुखापत झाली तर आठवडे बाजारात वादळी वाऱ्यामुळे दुकानदाराची चांगलीच तारंबळ उडली होती.