वरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला पती शेजारी झोपलेली असताना गावातीलच एकाने तीचा हात धरीत विनयभंग केल्याप्रकरणी वरणगाव पोलीसानी गुन्हा दाखल करीत एकास अटक केली
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला आपल्या राहत्या घरात पती शेजारी झोपलेली असताना गावातीलच राहणारा ललीत सुधाकर नावडे (२७ ) याने सदर विवाहितेचा हात धरून तीच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न करीत असताना तेवढयात शेजारीच झोपलेल्या पतीला जाग येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या हाताला झटका देऊन तो तरुण तेथून पसार झाल्या नंतर सदर घटनेची माहिती वरणगाव पोलीसाना विवाहितीच्या पतीने देताच पोलीस नाईक प्रशांत ठाकुर व पोलीस कॉ प्रमोद कंणखरे हे त्या गावात जाऊन त्या तरुणास त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पिडीत विवाहीत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून ललीत नावडे विरोधात भारतीय न्यायसहिता २०२३ चे कलम ७४ व ३५१ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सह फोजदार श्रावण जोहरे हे करीत आहे