वरणगावला गावठी कट्यासह दोन तरुण अटक

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वरणगाव शहराच्या स्टेशनवरील महात्मा गांधी विद्यालया जवळ एका टपरीवर दोन तरुणांना गावठी कट्यासह पोलीसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  साह्य पोलीस निरिक्षक जनार्धन खडेराव यांना दोन तरुणाजवळ गावठी व कट्टा व काडतुस असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे व प्रशांत ठाकुर यांनी याची खातरजाम करण्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाजवळ गेले. त्या ठिकाणी एक तरुण उभा व एक बुलेट मोटरसायकलीवर बसलेल्या अवस्थेत संशयितरित्या हलचाली करताना दिसले.  या तरुणांवर बारकाईने नजर ठेवून दोन तरुणांची चौकशी करून त्यांची अंगझडती घेतल्यावर एकाजवळ सिल्व्हर रंगाची सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन चार हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस आढळून आले.

दरम्यान पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याची कसुन चौकशी केल्याने एकाने आदेश ज्ञानेश्वर भैसे (वय १९) व दुसरा गौरव संतोष इंगळे (वय २०) दोघे राहणार वरणगाव असे सांगताच पोलीसानी त्यांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील बुलेट क्र एम एच १२ डी एन  ९०९७ मोटरसायकलीसह गावठी कट्टा व काडतूससह एकूण ९९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पो नाईक प्रशात ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहे.  सदर कारवाईत यासीन पिजारी , गोपीचंद सोनवणे , ईश्वर तायडे, फिरोज पठाण यांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.