वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरात शुक्रवार दि ७ रोजी माता रमाई आबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत दहा ते बारा जण जखमी करून मुर्तीची विटंबना केल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी दंगलखोराचा शोध घेतला जात आहे. तर आरोपीच्या अटकेसाठी दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सिध्देश्वर नगरला त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुक शेवटच्या टप्प्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुक आल्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी वाद घाऊन डिजे मालकास गाडीच्या खाली ओढून मारहाण करीत “हे गाणे का लावतो” अशी दमदाटी केली. तसेच मिरवणुकीत दगडफेक केल्याने मुर्तीच्या पायाला दगड लागल्याने विटंबना झाली तर मिरवणुकीत दहा ते बारा महिला व पुरुष किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळकडे धाव घेत अतिरिक्त पोलीस पथक व दंगा नियंत्रण पथकास पाचरण करीत परिस्थीवर नियंत्रण मिळवीत जमावाला शांत करण्यासाठी विनंती केली. तर दगडफेक करणाऱ्यांपैकी दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर इतराचा पाठलाग करीत असताना सहाय्यक पोलीस निरिक्षक अंधारात नालीत पडल्याने पायाला दुखापत झाली तर दंगा नियंत्रण पथक सिध्देश्वर नगर परिसरात ठाण मांडून बसले आहे.
दोन तास ठिय्या आंदोलन
घटना घडल्यानंतर शनिवारी सकाळी सामज बांधव एकत्रित येत महिला व पुरुषांनी पोलीस स्टेशनसमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. दंगलखोरांना तात्काळ अटक करा व गुन्हे दाखल करण्यासाठी आग्रही आंदोलकांना आदोलकांना जगन सोनवणे , मिलींद मेढे या समाज बांधवानी शांत केले, तर भुसावळ विभागीय पोलीस अधिक्षक कृष्णांत पिंगळे यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस सोमवार पर्यंत अटक करू असे आश्वासन दिले. पोलिसांवर विश्वास ठेवा , अनेक गुन्हे दाखल असलेल्यांच्या हद्दपारीचा यापुर्वीच प्रस्ताव पोलीसांनी पाठविलेला आहे. असे सांगत उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणद्वानीवर संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. प्रांत अधिकाऱ्यांनी निलेश काळेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने हद्दपारीचा प्रस्ताव आलेला असून मंगळवार दि. ११ रोजी त्यावर सुनावणी झाल्यानंतर पाच जिल्हा हद्दपारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितल्याने समाज बांधाव शांत होत आंदोलन मागे घेतले.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला आशाबाई कैलास बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार निलेश काळे , निलेश पवार , कृष्णा माळी , गोपाळ माळी , गोपाळ राजपूत व इतर दहावर भारतीय न्याय सहिता कलम १८९ (१) १८९ (2) (३) (४) ११८ (१) अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक ३ (१) (टी) ३ (१) (५) ३ (१) ( आर ) ३ (१) (एस) २९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे
पोलीस अधिक्षक वरणगावला
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते , स्थानिक गुन्हे शाखेचे बबत अव्हाड , अन्नपुर्णा सिंह व तहसिलदार निता लबडे यांनी वरणगावला भेट दिली. यावेळी समाज बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन करीत दंगलखोरांना पडकण्यासाठी योग्य त्या सुचना स्थानिक पोलिसांना केल्या आहेत.