भाजपा पदाधिकाऱ्याचे पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरात नव्याने मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा सुरू करा, नवीन जलकुंभातून पाणी वितरण करा, उन्हाळा सुरू होण्याआधी नव्याने, जॅकवेल विहीर आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मंजुर करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तपत कठोरा येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.  लेखी अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजुर असताना नगर परिषद प्रशासनाच्या हलर्जीपणामुळे पाणी वितरणाच अडचणी येतात व नागरिकांना पाण्यापासुन राहवे लगत आहे.  योजनेचे काम धड होत नाही तर विकास कॉलनी, प्रतिभानगरमधील नवीन जलकुंभ मंजुर असल्या नंतरही काम सुरू करण्यास दिरगाई होत आहे. तपतकठोरा येथील तापी नदीच्या पात्रात नवीन इनटेल जॅकवेल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजनेतून तात्काळ मंजूर करून बांधकाम करण्यासाठी भाजपाच्या वतीने तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

तासभर चाललेल्या आंदोलनाच्यावेळी मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणी व्यवस्थापन अभियंता डी. डी. पवार यांनी आदोलकांना समजिण्याचा प्रयत्न करीत विकास कॉलनीच्या जलकुंभ नदी पात्रात असल्याने त्याला पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने व प्रतिभा नगरमधील जागेच्या बाबतीत स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने ते काम बंद आह.  तर नवीन जॉकवेल विहीर मंजुर करण्यासाठी नव्याने त्याचा प्रस्ताव, प्रशासकीय मंजुरी, तांत्रीक मंजुरी घेतल्यानंतरच हे काम होणार असल्याचे सांगताच आंदोलन होत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजनेतून तात्काळ मंजुरी हट्ट धरून पाणीत बराच थांबले.

मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक जर्नाधन खंडेराव यांनी मध्यस्ती करीत व मुख्याधिकारी राऊत यांनी लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन  तुर्त मागे घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत नवीन पुरवठा योजनेचे पाणी वितरण न झाल्यास २० फेब्रुवारीला जनाक्रोश आंदोलन इशारा देण्यात आला.

यावेळी भाजपाचे सुनिल काळे, शे अखलाक शे युसुफ , मिलींद मेढे , तुकाराम कोळी , कदिर शेठ , नामदेव सोनवणे , बळीराम सोनवणे , अजमल खान , फजल शेख , सदिप माळी , राजु धोबी , मयुर शेळके , भोजराज पालवे , भगवान धनगर , आंबादास चौधरी , किरण धुंदे , राहुल जंजाळे , विशाल चौधरी , भाऊलाल टिटोरे,  मनीष भंगाळे, नरेंद बावणे, सागर कोळी, अनिल काळे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.