वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव शहरातील एका नामांकीत व्यापाऱ्याने अल्पवयीन मुलीला मोटर सायकलवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने तीला गाडीवर बसून अंधारात थांबवून तीची छेडखानी केली. सदर विनयभंग केल्याची घटना दि. १० रविवार रोजी घडली असुन व्यापाऱ्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नामांकीत श्री मॉलमध्ये पिडीत अल्पवयीन मुलगी कामाला होती. रविवार दि १० रोजी रात्री नऊ वाजेच्या वेळेस सदर अल्पवयीन मुलगी सोबत काम करणाऱ्या मुलीसोबत तीच्या वडीलासमावेत मोटर सायकलवरून तिघे जण जात असताना मॉल संचालक राजेद्र जोहरीलाल जैन हे त्याच वेळी मोटर सायकल घेऊन पाठलाग करून त्यांची गाडी थांबवून मी पण तीकडे जात आहे, असे पिडीत मुलीला सांगून आपल्या मोटर सायवलवर बसविले व थोड्या अंतरावर अंधार असलेल्या जागेवर गाडी उभी करून अल्पवयीन मुलीचा हात धरून तिची छेड काढीत तीला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
सदर मुलगी दुसऱ्या दिवशी कामावर का जात नाही असे आईने विचारले असता घडलेला प्रकार तिने सांगितला. म्हणून व्यापारी राजेंद्र जोहरीलाल जैन यांच्या विरोधात पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सह पो निरिक्षक जर्नाधन खडेराव हे करीत आहे